मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले,’ असं ते म्हणाले.

सत्तानाट्यात भाजपने उडी घेताच शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांना दिला धोक्याचा इशारा

ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उद्याच?

राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यात आजवर विंगेतच राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मंगळवारी अखेर थेट रंगमंचावर प्रवेश केला असून, त्यामुळे या नाट्यातील निर्णायक प्रवेश सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले असताना, ‘या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे’, अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्राद्वारे केली. या पत्रानंतर आता राज्यपाल कोश्यारी कुठली भूमिका, कधी घेतात, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here