मुंबई: गुवाहाटीतील शिवसेनेचे काही आमदार परत येतील, असे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटते. मात्र, त्यांना फक्त वेडी आशा आहे हो, प्रत्यक्षात असे काहीही घडणार नाही, असे वक्तव्य बंडखोर शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं तरी हे सरकार पडेल, ३९ लोकं तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसं बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना असलेली वेडी आशा आहे. शिवसेनेतील मोठ्या नेत्यांना हीच आशा आहे, आता यावर मी काय बोलणार? लहान मुलं अशी विधानं करू शकतात. पण मोठी लोकंच अशी बोलायला लागली तर बघायलाच नको. गुवाहाटीत शिवसेनेचे सर्व आमदार आनंदात आहेत. वाटल्यास आम्ही त्यांचे व्हिडिओ शेअर करायला तयार आहोत. त्यामुळे ३९ बंडखोर आमदारांपैकी कुणीही शिवसेनेकडे परत जाण्याची शक्यता नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप, कोर्टात याचिका दाखल
दीपक केसरकर यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीवेळी शिंदे गट मुंबईत येईल, असे सांगितले. त्यासाठी लवकरच एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुवाहाटीतून बाहेर पडतील. आम्ही सर्वजण मुंबईच्या जवळ येऊन राहू. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी आम्ही गुवाहाटीतून निघण्याची दाट शक्यता असल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत लवकरच बहुमत चाचणी होईल, असा दावाही केसरकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचे ठरवले आहे. त्यांनी न्यायालयात खुशाल जावे. पण न्यायालयात बहुमत चाचणीत कोणतीही आडकाठी आणणार नाही, असे केसरकर यांनी म्हटले.

दीपक केसरकर यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्त्वाशी बोलून काही मार्ग निघतो का, हे पाहावे, असे म्हटले होते. पण आता ती वेळही निघून गेली आहे. आमच्याकडूनही शिवसेनेशी चर्चेची सर्व दारं बंद झाली आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची मुख्य मागणीच मान्य होत नाही तर आम्ही पुन्हा येऊन काय करु, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

आम्ही उद्या मुंबईत पोहोचू: एकनाथ शिंदे

मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले. आम्ही सर्व आमदारांना घेऊन अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here