मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांकडे आम्ही १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र तो मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. आता बहुमत चाचणीबाबत मात्र ते चांगलीच तत्परता दाखवत आहेत. राफेलपेक्षा राज्यपालांचा वेग जास्त आहे,’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार फोडून भाजप राज्यातील सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, असं उपरोधिक भाष्यही राऊत यांनी केलं आहे.