जळगाव : फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने चुकीच्या साईडने येणार्‍या ट्रकने उडविले. यानंतर हाच ट्रक आणखी एक ट्रकवर धडकून या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.१९.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने फैजपूर येथील बाजारासाठी जात होते. यावेळी नशीराबाद ते साकेगाव दरम्यान महामार्गावर सिमेंट फॅक्टरी ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रकने दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. या तिहेरी वाहनांच्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

गुप्तधन, ‘ती’ खोली, २० नारळ, काळा चहा; सांगलीतल्या ९ जणांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम वाचून हादराल

हा अपघात इतका भयंकर होता की पाच जणांचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. दोन्ही मालवाहू चक्काचूर झाल्या असून एक मालवाहूची ट्रॉली ट्रकला चिकटली होती. मयत आणि जखमींना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. महामार्गावर वाहतूकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

‘संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, ५६ मिनिटांची सीडी आमच्याकडे’; शिवसैनिकाचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here