‘एकीकडे ज्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ११ जुलै रोजी सुनावणी ठेवली असताना राज्यपालांनी घाईघाईत अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला आहे. ही राज्यघटनेचीच पायमल्ली आहे. याबाबतची भीती आम्ही त्यादिवशीच बोलून दाखवली होती,’ असे सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती जे. बी. पर्डीवाला यांच्या खंडपीठाने आजच संध्याकाळी शिवसेनेच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. त्यादृष्टीने संबंधित सर्व कागदपत्रे राज्यपाल, बंडखोर आमदार, राज्य सरकार यांच्या वकिलांना दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याचे निर्देश खंडपीठाने सिंघवी यांना दिले आहेत.
Home Maharashtra supreme court hearing, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी; शिवसेनेच्या अर्जावर आज संध्याकाळी ५...
supreme court hearing, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी; शिवसेनेच्या अर्जावर आज संध्याकाळी ५ वाजताच होणार सुनावणी – big news from the supreme court; shiv sena’s application about floor test will be heard at 5 pm today
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर या आदेशाविरोधात शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावेळी शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात त्यांचा अर्ज आणि महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती देऊन तातडीची सुनावणी घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर शिवसेनेच्या अर्जावर आजच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने निश्चित केले आहे. संध्याकाळी ५ वाजता याबाबत सुनावणी होणार आहे.