Gulabrao Patil Slams Uddhav Thackeray: संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो.

 

हायलाइट्स:

  • आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे
  • काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत
  • आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत, असे वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने याठिकाणी पोहोचलो आहोत. आपण या पदापर्यंत पोहोचण्यात आपली किमान २० टक्के मेहनत नक्कीच आहे. आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेसाठी (Shivsena) खूप काही केले आहे, असे वक्तव्य आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे वेध लागले आहेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला पोहोचतील. त्यापूर्वी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
शिंदे गटाच्या बंडखोरांचा पुढचा मुक्काम गोव्यात, पंचतारांकित हॉटेलमध्ये ७१ खोल्या बुक
आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा; बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे तीन मंत्री व १ आमदार गैरहजर राहणार?
‘ठीक आहे, आजपासून मी बोलायचं थांबतो…’

बंडखोर आमदारांनी त्यांच्याविषयी उपस्थित केलेल्या नाराजीविषयी संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर संजय राऊत यांनी म्हटले की, ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे.महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे, त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत, मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि मी ते काय आहेत, हे मला माहिती आहे.आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झालाय,आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत बोलणारच, असे संजय राऊत यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena mla gulabrao patil slams uddhav thackeray sanjay raut before floor test in maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here