नुपूर शर्मावर झालेल्या गदारोळात हा संपूर्ण वाद सुरू झाला. कन्हैयालालच्या मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करण्यात आली होती. ही पोस्ट त्यांच्या ८ वर्षाच्या मुलाने चुकून टाकल्याचा दावा कन्हैयाने केला होता. तेव्हापासून कन्हैयाला धमक्या मिळू लागल्या.
पोलिसांनी १० जून रोजी कन्हैयालालला केली अटक..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैयालालच्या पोस्टमुळे दुखावलेल्या काही लोकांनी उदयपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी कन्हैयालालविरुद्ध १० जून रोजी गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी त्याला अटक केली. मात्र, कन्हैयाला न्यायालयात हजर झाल्यानंतर जामीन मिळाला होता.
कन्हैयाने मागितली होती सुरक्षा
कन्हैयालालची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याला सतत धमक्या मिळू लागल्या. कट्टरपंथीयांनी फोन आणि एसएमएस करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे १५ जून रोजी कन्हैयाने पोलिसांकडे तक्रार केली. आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगत त्याने पोलीस सुरक्षा मागितली होती. पण यावर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही. पोलिसांनी यावर धमकी देणाऱ्यांना अटक करण्याऐवजी दोघांमध्ये तडजोड केली आणि दोघांनाही समजवू सोडून दिलं.
१७ जूनला खुनाची धमकी, २८ तारखेला अखेर संपवलं…
आरोपी मोहम्मद रियाझने १७ जून रोजी एक व्हिडिओ बनवून घोषणा केली होती की, जो कोणी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात बोलले त्यांचे शिर कापून टाकू. अखेर आरोपीने सांगितल्याप्रमाणेच केले. या घोषणेच्या ११ व्या दिवशी त्याने त्याचा साथीदार मोहम्मद याने कन्हैयालालची निर्घृण हत्या केली.
कसा रचला हत्येचा कट?
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोघेजण कपडे शिवण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आले. काही कळण्याच्या आत त्यांनी तेली यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले आणि त्यांचा गळा चिरण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
आरोपी रियाज आणि मोहम्मद याने त्याप्रकारे ही निर्घृण हत्या केली, त्यानुसार परिसरात पोलिसांचा धाक उरला नाही हेच समोर येतं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. तर यामुळे शहरातही तणावाचं वातावरण आहे.