मुंबई सध्या मराठी मालिकांमधून नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण काही चेहरे असेही आहेत की, मालिका संपल्या तरीही प्रेक्षकांच्या मनात आहे. काही कारणांमुळं या कलाकारांनी सिनेसृष्टीपासून दूर जाणं पसंत केलं. पण चाहत्यांना त्यांच्या कमबॅकची प्रचंड उत्सुकता आहे. असंच एक नाव म्हणजे अभिनेत्री नीलम शिर्के.
एका साडीने श्वेता शिंदेला केलं भावुक, म्हणाली- ‘साडी नेसले आणि त्यांची आठवण आली’
अभिनेत्री नीलम शिर्केनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दिवसापासून ती कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात दिसली नाही. त्यामुळं नीलम सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

काही वर्षे सिनेसृष्टीत काम केल्यानंतर नीलमनं महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतयांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर ती संसारात रमली असून ती सध्या रत्नागिरी इथं राहतेय.
स्वत:ला रोखू शकला नाही शाहिद, मीराला ओढलं आणि…लिपलॉकचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सक्रिय
सिनेसृष्टीपासून नीलम दूर गेली असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. भटकंतीची आवड असलेली नीलम तिचे ट्रीपचे फोटो शेअर करत असते. नीलमच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतो.

चाहत्यांना कमबॅकची उत्सुकता

नीलमच्या चाहत्यांना तिच्या कमबॅकची उत्सुकता असून सोशल मीडियावर तिनं शेअर केलेल्या फोटोंखाली चाहते तिला कमबॅकबद्दल विचारताना दिसतात. आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर मीस करतोय, अशा प्रतिक्रिया निलमच्या फोटोंखाली पाहायला मिळत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here