राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना शिवसेनेकडून त्यांना हिरवा साप म्हणून टीका करण्यात यायची. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सामावून घेतल्याचे चित्र होते. मात्र, आता त्यांनी मंत्रिपद असताना देखील एकनाथ शिंदे गटात सामील होऊन शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.
बंडखोर आमदार तिथे जाऊन ऐशोआराम करत आहेत. झाडे आहेत, डोंगर आहेत, पाणी आहे, असं सांगत आहेत. येथे लोकांना काही ठिकाणी पाणी नाही. काही ठिकाणी तलाव रिकामे पडले आहे. काही ठिकाणी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातला शेतकरी त्रासला आहे, असंही खैरे म्हणाले. बंडखोरांच्या कार्यालयावर आपण का गेला नाहीत? असा सवाल खैरे यांना यावेळी विचारण्यात आला. यावर, आम्ही बंडखोरांच्या कार्यालयावर गेलो पण पोलिसांनी जाण्यास मनाई केली, असं खैरे यांनी सांगितलं. काही हरकत नाही गेलो तर पण दोन-चार दिवसांनी पोलिस राहतील का तिथे? त्यानंतर तयार आहेत सर्व आणि सेना स्टाईलने आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला. आज नाही दोन-चार दिवस झोपू द्या त्यांना आणि झोपेतून जागं करू आणि विचारू की ही मुंबई आहे की गुवाहाटी आहे?, असं चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवलं.
तेजस्वी यादवांचा असदुद्दीन ओवेसींना धक्का, एमआयएमच्या आमदारांना फोडलं, भाजपलाही मागं टाकलं