अभिनेत्री एकत्रित नाहीत म्हणूनच मराठीमध्ये पैसे कमी मिळतात- सई
निकनं आपल्या डान्सला दिली मजेशीर कॅप्शन
प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनसनेही इन्स्टाग्रामवर आपल्या बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यावर गमतीशीर कॅप्शनही लिहिली आहे. त्यानं लिहिलं आहे, हाच तर फरक आहे. हिप्स डोंट लाय वर्सेस हिप्स डू लाय!
शकिरानं दाखवला डान्स
शकिरा जगभरात बेली डान्ससाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला तिनं निकला नृत्यासाठी बोलावलं. त्यानंतर तिनं कसं करायचं, ते दाखवलं. निकनं तसा प्रयत्नही केला. पण प्रेक्षक हसायला लागते. निक म्हणाला, माझं शरीर हे करू शकत नाही.

निकचा डान्स पाहून प्रियांकाला हसू आवरेना
प्रियांका चोप्रानं इन्स्टाग्राम स्टोरीत निक जोनसचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर पतीच्या प्रयत्नाचं कौतुक केलं आहे. सोबत स्माइल इमोजी आणि हार्ट इमोजी शेअर केली आहे. डान्सिंग विथ मायसेल्फ या शोमध्ये शकिराबरोबर निक जोनसही जज म्हणून होता. शकिरा बेली डान्सचं चॅलेंज देत पहिल्यांदा स्वत: करून दाखवते, नंतर निकला करायला सांगते.
Video : रणबीर कपूर म्हणतोय जी हुजूर, ‘शमशेरा’मधला तुफान डान्स झाला Viral
प्रियांकानं निकबरोबरचे काही फोटो, व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. प्रियांकानं यावेळी काळ्या रंगाची बिकनी घातली होती. फोटो आणि व्हिडिओमध्ये निक आणि प्रियांका खूपच रोमँटिक झालेले दिसत होते. प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये लव्हबर्ड समुद्रकिनारी फिरत होते, तर काही फोटोंमध्ये ते दोघं यॉर्टवर बसून समुद्रात फिरताना दिसत होते.
संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्यांची बर्थडे पार्टी