मुंबई: कलाकारांबद्दल नेहमीच काही ना काही अफवा चर्चेत असतात. सध्या दाक्षिणात्य अभिनेत्री हिच्याबद्दल अशाच अफवा पसरल्या आहेत. नायिका म्हटलं, की निर्मात्याला त्रास देणं आलंच! याच मानसिकतेतून रश्मिकानं पाळलेल्या कुत्रीसाठी निर्मात्यांकडे विमानाचं तिकीट आणि खास व्यवस्थेची मागणी केल्याची चर्चा होती.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळं नेटकऱ्यांनी रश्मिकाला चांगलंच फैलावर घेतलं होतं. इतकंच नाही, तर ‘यश डोक्यात गेलंय का,’ वगैरे विचारणाही तिला सुरू झाली होती. या सगळ्याची रश्मिकाला गंमत वाटली. तिनं त्यावर तिचं मत व्यक्त केलं.
रश्मिका म्हणते, ‘हसून हसून बेजार झाले आहे. आता इतकाही वाह्यातपणा नको. जरी तुम्हाला वाटत असेल, की माझ्या ऑरानं माझ्यासोबत प्रवास करावा, तरी तिला तशी इच्छा नाही. ती हैदराबादमध्ये आनंदी आहे. तुमच्या या काळजीसाठी धन्यवाद, या प्रकरणानं माझं खूप मनोरंजन झालं.’ सध्या रश्मिका ‘मिशन मजनू’ या चित्रपटाचं काम करत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा तिचा नायक आहे. रणबीर कपूरसोबत ती ‘अॅनिमल’ या चित्रपटातही दिसणार आहे.