एसटीमध्ये सापडली बेवारस पिशवी; पोलिसांनी उघडताच हादरले, आषाढी वारीमुळे चिंता वाढली
पंखा खाली पडताच कुटुंबीयांना धक्का बसला, खूप मोठा आवाजही झाला. पंख्याच्या पात्यांनी मोठा घात केला असता पण या पात्या अशा पडल्या की यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पंखा पडला तेव्हा कुटुंब घाबरलं पण दुसऱ्याच क्षणी आपण सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबाने मोठा श्वास घेतला.
दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जाको राखे सैयां मार सके ना कोये…’ या व्हिडिओमध्ये ६ लोकांचे कुटुंब जमिनीवर चटईवर बसून एकमेकांशी बोलत असताना रात्रीचे जेवण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.