मुंबई- राजस्थानमधील उदयपूर शहरात दिवसाढवळया दोन लोकांनी कन्हैय्यालाल याची गळा चिरून हत्या केली. हत्या झालेला कन्हैयालाल हा शिंपी होता आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. कपडे शिवण्यासाठी माप देण्याचा बहाणा करून मारेकरी त्याच्या दुकानात घुसले आणि त्याची हत्या केली. कन्हैय्यालालचा दोष इतकाच होता की त्याच्या आठ वर्षाच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

हनुमान चालिसा ऐकत निर्मात्यानं केली शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

उदयपूरमध्ये घडलेल्या या हत्याकांडाचे पडसाद देशभर उमटले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड कलाकारांनीही आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत कन्हैय्यालालसारख्या सर्वसामान्य निर्दोष माणसाची हत्या करणारे मारेकरी माणूस नसून राक्षस असल्याचे बॉलिवूड कलाकारांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्यामुळे शर्मा यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ प्रतिक्रिया येत होत्या. या प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरणही तापलं होतं. या परिस्थितीत कन्हैय्यालालच्या मुलाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने वातावरण बिघडलं. यातूनच कन्हैयालालची हत्या करण्यात आली. मारेकरी गौस मोहम्मद आणि रियाज जब्बार यांनी हत्येनंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीही दिली होती. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

‘ए वडापाव’ अल्लु अर्जुनला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, कशामुळे होतेय टीका

बेधडक बोलणारी अभिनेत्री कंगना रणौत ने तिच्या इन्स्टा स्टोरीवर कन्हैयालालचा फोटो शेअर करत लिहिलं की उदयपूरमध्ये नुपूर शर्मा समर्थनाच्या कारणाने या व्यक्तीचा नाहक बळी गेला. मारेकऱ्यांनी त्याचा गळा धडापासून वेगळा केला. देव किंवा धार्मिकतेच्या नावावर अशाप्रकारच्या घटना घडणं अत्यंत चुकीचं आहे. या घटनेनं मी सुन्नं झाले आहे.

कंगना रणौत

मसान सिनेमाचे निर्माते मनीष मुंद्रा यांनी कन्हैयालालच्या परिवाराच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मुंद्रा यांनी कन्हैय्यालालच्या बायकोला ११ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. मुंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही मदत देत असल्याचं सांगितलं.

द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या घटनेवर मत देत हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं सोशल मीडियावर शेअर केलं. देशात एका हिंदू व्यक्तीला राहणं अवघड झालं आहे. जर अशा स्थितीत जगायचं असेल तर नक्षलवादी बना किंवा भूमिगत व्हा असं म्हणत विवेक यांनी कन्हैयालालचे स्केच शेअर केले.

संवेदनशील कलाकार अशी ओळख असलेल्या अनुपम खेर यांनीही या घटनेवर राग व्यक्त केला आहे. त्यांनी टवीट करत मी स्तब्ध आहे, मी सुन्न आहे असं लिहिलं आहे. लोकांच्या मतस्वातंत्राला काहीच किंमत नाही असं त्यांनी नमूद केलंय.

स्वरा भास्करही उदयपूर घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिने मारेकऱ्यांना राक्षसाची उपमा दिली असून ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. देवाच्या नावावर एखाद्याचा जीव घेणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली पाहिजे असंही स्वराने म्हटलं आहे.

रिचा चड्ढाही या प्रकरणावर व्यक्त झाली आहे. अशा प्रकारचा किंवा या प्रकरणी कोणताही व्हिडिओ शेअर करू नका असा सल्लाही तिने दिला आहे. कन्हैय्यालालच्या कुटुंबाला यातून धोका होऊ शकतो. मारेकऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे असंही रिचाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here