गुवाहाटी : शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” या वाक्याची संपूर्ण माहाराष्ट्राला क्रेज लावलं आहे. आपल्या बोलण्यात तोच रांगडापणा आणि शहरी वातावरणाचा अनुभव शहाजीबापूंनी आपल्या कार्यकर्त्याजवळ परफेक्ट मांडला असल्याचं सध्या नेटकरी सांगत आहेत. सध्या प्रत्येकाच्या व्हॉट्स अॅप स्टेटसला त्यांचा हाच डायलाॅग खूप गाजत आहे. मनातील भावना आणि आपल्या स्वत:चा फोटो, हेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान, गोव्याला निघण्यापूर्वी भाषण, शहाजी पाटलांनी पोट धरुन हसवलं. शहाजी पाटलांनी आपल्या स्टाईलनं सांगितला राजकारणातला अनुभव. काय डोंगर, काय झाडीची’ कहाणी शहाजी बापूंनीच सांगितली. शहाजी बापूंनी खास शैलीत भाषण करत सर्व आमदारांना खळखळून हसवलं.
त्यांनी यावेळी देखील आपल्या भाषणाची सुरूवात “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” या वाक्यानेच केली. या भाषणात त्यांनी आपला राजकारणातला अनुभव आपल्याच शैलीत सांगितला. ‘वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे. मी वसंतदादा पाटलांना कधी दगा देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं होतं’. त्याचदिवशी बातमी आली की शरद पवारांनी बंड केलंय ४० आमदार घेऊन पळून गेले आणि वसंतदादांनी राजीनामा दिला. माझा अनुभव खूप जोरात आहे.
वसंतदादा पाटलांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांसोबत राहण्यास सांगितलं पण काय झालं?. कुठे आहे वसंतदादांचं घर?, कुठे आहे प्रतारावांचे घर?, कुठे आहे श्रिपाद जोंधळेंचं घर?, विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे हुशारीने पळून गेले. नाहीतर राजीव गांधीकडून यांचा पण चुरा केला असता. त्यामुळे ‘आपण लांब आहे चांगलं आहे’. एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांना बापूंच्या डायलॉगची भुरळ पडली आहे. तसेच हा डायलॉग एवढा व्हायरलं झाला आहे की, त्याची लोकांनी गाणी देखील तयार केली आहेत.