जळगाव : जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरातील जागा एका वकील कुटुंबीयांनी न्यायालयातून लढा देत मिळवली. जागा सोडावी लागल्याने संतप्त झालेल्या शेजारच्यांनी वकील कुटुबीयांना भीती घालण्यासाठी आमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी रक्त, कनकेचा गोळा, लिंबु-मिरची फेकून भीती घातल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील शिवाजीनगर दालफडमध्ये अॅड. केदार भुसारी हे पत्नी अंजली व मुलगा कार्तिक यांच्यासमवेत राहतात. त्यांच्याच जागेवर प्रकाश रामेश्वर व्यास, ललिता प्रकाश व्यास, सुशिला गोपाळ पंडीत, विद्या गोपाळ पुरोहीत ४५ वर्षांपासून राहत होते. ही जागा भुसारी यांच्या आजोबांनी त्यांना राहण्यासाठी दिली. यानंतर सन २००७ मध्ये ही जागा रिकामी करण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर भुसारी यांनी न्यायालयात दाद मागितली. तब्बल १० वर्षानंतर कामकाज होऊन सन २०१७ मध्ये जागेचा ताबा भुसारी यांना मिळाला.

छत्रपतींच्या नावाला विरोध कसला करायचा? नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं कौतुक
भुसारी यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्या मनात भुसारी कुटुंबीयांवर राग आहे. ३० मे २०२२ रोजी दुपारी तीन वाजता भुसारी यांच्या गेटवर मानवी केस, हळद-कुंकू आढळून आले होते. १४ जून रोजी बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर रक्त टाकले आढळून आले होत. २८ जून रोजी कणकेचा गोळा व त्यावर काळी बाहुली, हळद-कुंकू वाहिलेले, पिवळ्या अक्षरात अंजली भुसारी यांच्या पत्नीचे नाव लिहीलेलं दिसलं. त्यानंतर काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या, लिंबु व त्यावर सुया टोचलेल्या होत्या हे सर्व अंजली यांच्यासमोर कुणीतरी फेकलं. यामुळे अंजली प्रचंड घाबरल्या होत्या.

दरम्यान, जागा रिकामी करण्यासाठी हे प्रकार शेजारी राहणाऱ्या पाच जणांकडून होत असल्याचा संशय त्यांना आहे. हे प्रकार वाढत असल्यामुळे अखेर भुसारी दाम्पत्याने काल मंगळवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शेजारी राहणाऱ्या पाच जणांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच समुळ उच्चाटन करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here