शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आल्यानंतर विमानतळापासून विधानमंडळात पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यासाठी मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत.

 

Amit Shah CRPF
अमित शाह

हायलाइट्स:

  • सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत
  • केंद्र सरकार सतर्क
  • आमदारांना सुरक्षा देण्यासाठी सीआरपीएफ मुंबईत
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळं अडचणीत सापडलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला ३० जून रोजी सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन बंडखोर आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मुंबईत पोहोचले आहेत.

२ हजार जवान मुंबईत दाखल
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आल्यानंतर विमानतळापासून विधानमंडळात पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. गोव्यातून आमदार मुंबईत येणार आहेत. यापूर्वी केंद्र सरकारनं १५ आमदारांना वाय सुरक्षा दिली होती. आता उद्याच्या बहुमत चाचणीसाठी आमदारांना सुरक्षितपणे विधानमंडळात पोहोचवण्यासाठी दिल्ली आणि उत्तर भारतातील सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांनी जवान मुंबईत पोहोचले आहेत.
अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : उद्धव ठाकरे
आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्ले होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सतर्कता घेण्यात आली आहे. आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचतील यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. उद्याच्या बहुमत चाचणीच्या निमित्तानं मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. कोणीही प्रक्षोभक वक्तव्य करु नये, बॅनर लावू नये यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
छत्रपतींच्या नावाला विरोध कसला करायचा? नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं कौतुक
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात सायंकाळी पाच पासून युक्तिवाद सुरु आहे. शिवसेनेच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कौल यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीनं तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. राज्यपालांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं नसल्याचं तुषार मेहता म्हणाले.
छत्रपतींच्या नावाला विरोध कसला करायचा? नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं कौतुक 92525100

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis maharashtra floor test union home ministry sent two thousand crpf personals in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here