शाहरुख खानचा ‘जवान’ रिलीजआधीच झाला कोट्यधीश, OTT राइट्सचा झाला फायदा!
हिंदीत लिहिलंय धमकीचं पत्र
स्वरा भास्करला जिवे मारण्याची धमकी देणारं पत्र हिंदीत लिहिलं आहे. यात स्वराबद्दल अपशब्द लिहिले आहेत. विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल ही धमकी दिली आहे. खाली या देशाचा नौजवान असं लिहिलं आहे. स्वरानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

स्वरानं सावरकरांविरोधात केल्या होत्या पोस्ट
स्वरा भास्कर नेहमीच राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. २०१७मध्ये तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलं आहे, सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. तुरुंगातून सुटण्यासाठी विनंती केली होती. ते वीर नव्हते.’ २०१९ मध्येही स्वरानं एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिनं सावरकरांना भित्रे म्हटलं होतं.
Video : आयुष्य फक्त जगू नका ते अनुभवा, म्हणत संजना घेतेय पावसाचा आनंद
स्वरा भास्कर शीर कोरमा सिनेमात दिसली होती. त्यात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता होती. आपल्या कामाबद्दल स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘तनु वेड्स मनु’, ‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘निल बटे सन्नाटा’, ‘अनारकली ऑफ आरा’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात तिनं काम केलं आहे. तसंच ‘रसभरी’, ‘फ्लेश’ आणि ‘भाग बिन्नी भाग’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.