मुंबई- २००८ मध्ये ‘बालिका वधू’ मालिकेत आनंदीची भूमिका साकारणाऱ्या अविका गौरने तिच्या गोड आणि निरागसतेने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. यानंतरही अविकाने अनेक मालिकांमध्ये काम करून टीव्ही जगात खूप नाव कमावले आहे. आज ३० जूनला अविका गौर तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे (Avika Gor Birthday). गेल्या १४ वर्षांत अविकाच्या लूकमध्ये बरेच बदल झालेत. छोटी आनंदी क्यूट होती तर आताची अविका फारच ग्लॅमरस आहे.

तो सीन ज्याने मोहम्मद जुबैर गेले तुरुंगात, कसा झाला ‘हनिमून’ ‘हनुमान’ वाद

२००८ मध्ये, अविका गौर बालिका वधूमध्ये खूपच लहान होती आणि या मालिकेत तिने बालविवाह झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती (Balika Vadhu Serial). ही मालिका राजस्थानच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात आली होती, त्यामुळे अविकासह इतर कलाकारही भरपूर दागिने आणि जड पेहरावात दिसले होते.

आनंदी

बालिका वधूनंतर अविकाला २०११ मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने खूप प्रसिद्धी मिळाली. मालिकेत तिने दीपिका कक्कर म्हणजेच सिमरची बहीण रोलीची भूमिका साकारली होती. यावेळी अविका लहान होती, मात्र तेव्हापासून तिचा लूक पूर्णपणे बदलत गेला. ससुराल सिमर का मालिकेत अविकाचं लग्नही त्यात दाखवण्यात आले. अविकाने अगदी लहान वयातच सून आणि विवाहित स्त्रीच्या भूमिका चांगल्या वठवल्या. मनीष राय सिंघनसोबतची तिची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेतूनच अभिनेत्रीची लोकप्रियता आणखी वाढली.

आनंदी

मालिकांव्यतिरिक्त अविकाने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन ९’, बॉक्स क्रिकेट लीग सीझन २ सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. या शोमध्येही तिच्या लूकमध्ये खूप बदल करण्यात आला होता. याशिवाय आता ती बॉलिवूडमध्येही आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या अविका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःचे अनेक हॉट फोटो शेअर करत असते.

निलेशच्या यशामागे रितेशचा मोठा हात, ‘चला हवा येऊ द्या’च्या पहिला एपिसोडची कहाणी


काही दिवसांपूर्वी अविकाने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला होता. सुरुवातीला तिचं वजन खूप जास्त होतं, मात्र योग्य आहार आणि व्यायामाने तिने आपलं वजन नियंत्रणात आणलं. त्यामुळेच तिचे आताचे फोटो आणि आधीच्या फोटोंमद्ये खूप फरक दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here