रोमँटिक फोटोमागची दास्तान
एका मुलाखतीत रणबीर कपूरला काही जुने फोटो दाखवले गेले. त्या फोटोमागच्या गोष्टी त्याला विचारल्या. त्यातला एक फोटो ऐश्वर्याबरोबरचा होता.
PHOTO: साडीत खुललं रश्मिकाचं सौंदर्य, ‘नॅशनल क्रश’चा रेड हॉट लूक व्हायरल
ऐश्वर्यासोबतच्या फोटोबद्दल बोलला रणबीर
ऐश्वर्या आणि रणबीरचा खूप रोमँटिक फोटो जेव्हा दाखवला, तेव्हा अभिनेता म्हणाला, ‘हा फोटो पाहून कोणाला असुया नाही वाटणार?’ हा फोटो ऋषी कपूर यांच्या आ अब लौट चले सिनेमाच्या सेटवर काढला होता. फोटो न्यूयाॅर्कमध्ये काढलेला. रणबीरनं माशाबेल इंडियाशी बातचीत करताना म्हटलं, ‘मी ऐश्वर्याहून तसा ९ वर्षांनी लहान आहे. तरीही ती माझ्याशी अगदी मित्रत्वानं वागत होती. आम्ही त्यावेळी सिनेमाबद्दल बोलायचो, एकत्र जेवायचो.’

रणबीर म्हणाला, मी खरंच नशीबवान
रणबीर कपूर म्हणाला, त्या वेळी ऐश्वर्याबरोबर हम दिल दे चुके है सनम सिनेमातल्या व्यक्तिरेखेबद्दलही बातचीत केली. त्यानंतर जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनबरोबर काम करायला संधी मिळाली, तेव्हा रणबीर स्वत:ला भाग्यवान समजायला लागला. तो म्हणाला, अनेकांना स्क्रीनवर ऐश्वर्याबरोबर रोमान्स करायची संधी मिळत नाही.

बाळाच्या स्वागताला रणबीर सज्ज
रणबीर ब्रह्मास्त्र आणि शमशेरा सिनेमांत व्यस्त असला, तरी आता त्याचं सगळं लक्ष आलिया भट्ट आणि त्याच्या येणाऱ्या बाळाकडे आहे. तो कमालीचा आनंदी आहे.
जेव्हा आलियाच्या आई होण्याच्या बातमीचीही उडवली जाते खिल्ली
२२ जुलैला रिली होणार शमशेरा
रणबीरचा शमशेरा येत्या २२ जुलैला प्रदर्शित होईल. त्यात वाणी कपूर, संजय दत्त यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
चाहत्यांना उत्सुकता