मुंबई : गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक अखेर संपला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांच्या बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. यावर राज्यभरातील शिवसैनिक नाराज आहेत. अशात फायर आजींनीही यावर नाराजी व्यक्त केली असून काहीही झालं तर आम्ही शिवसेना सोडणार नाही, उद्धव ठाकरेंना आम्ही ताकद देणार अशी प्रतिक्रिया त्यांनी मटाशी बोलताना दिली आहे.

ज्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांना जाऊद्या पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंनाच निवडणूक देणार. बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. त्यांनी काहीही काळजी करू नये. आम्ही त्यांना बळ देणार आणि शिवसेना पुन्हा ओपन करणार असं फायर आजींनी (Fire Aaji Video) म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं.

Mumbai Crime: प्रेमप्रकरणातून ३ महिलांची हत्या एकाची आत्महत्या, रुग्णालयात मृतदेह आढळल्याने खळबळ

गद्दारी केलेल्यांना त्यांची शिक्षा नक्की मिळणार. साहेबांनी घाबरायचं नाही. आम्ही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी सदैव आहे. हीच शिवसेनेची ताकद आहे. या सगळ्यामुळे आम्ही भावनिक झालो आहोत. तर साहेबांनाही यामुळे त्रास झाला असेल. पण त्यांनी मुख्यमंत्री पद अडीच वर्ष काढलं आहे. त्यांनी कोणाच्या दबाखाली नाही तर स्वत:हा पदाचा राजीनामा दिला आहे, अशा भावनाही आजींनी व्यक्त केल्या.

फायर आजी पुढे म्हणाल्या की, ‘बाळासाहेब ठाकरे असतानापासून आम्ही शिवसेनेत आहोत. त्यामुळे आम्ही साहेबांना हरू देणार नाही. आम्ही पुन्हा शिवसेना ओपन करणार. इतक्या वर्ष शिवसेनेत राहून त्यांनी गद्दारी करायसा नको होती. त्यांना साहेबांनी काय कमी केलं. पण तरीही त्यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांचं कधीही चांगलं होणार नाही.’

एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत आले तर…

एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत आले तर त्यांना घेणार का असं विचारलं असता, आता त्यांना शिवसेनेत घेण्याचा काही विषयच नाही आहे. त्यांनी गद्दारी केली आहे. आता त्यांना शिवसेनेत घेणार नाही. पण साहेबांनी यावर काहीही काळजी करू नका. आपण सगळे शिवसैनिक एकत्र येऊ आणि आपली शिवसेना पुन्हा ओपन करू’, अशा शब्दात फायर आजींनी उद्धव ठाकरे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

एसटीमध्ये सापडली बेवारस पिशवी; पोलिसांनी उघडताच हादरले, आषाढी वारीमुळे चिंता वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here