मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे राजकारण तापलंय, तर दुसरीकडे असंख्य लोक विठुमाऊलीच्या दर्शनाला निघाले आहेत. पंढरपूरकडे वाऱ्यांचं प्रस्थान सुरू आहे. या वारीचा मोह भल्याभल्यांना पडतो. अगदी आपल्या कलाकारांनाही. आई कुठे काय करते मालिकेतली अनघा म्हमजेच अश्विनी महांगडेही वारीत गेली. तिथले फोटो, व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जेव्हा १०२ वर्षांच्या टीव्हीवरच्या आदेश बांदेकरांशी बोलायच्या

नऊवारी साडी, अंगावर दागदागिने असा खास मराठमोळा थाट लेवून अश्विनी महांगडे वारीत पोहोचली. तिथं तिनं वारकऱ्यांची विचारपूसही केली. वारीतल्या महिला वर्गाशी खास गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर नाचाचा फेरही धरला. अगदी आनंदमय वातावरणाचा अनुभव अश्विनीनं घेतला.

इतकंच नाही तर तिनं वारकऱ्यांबरोबर जेवणही केलं. एकत्र जेवतानाचे फोटोही सोशल मीडियावर आहेत. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेली अश्विनी लिहिते, आज हरपल देहभान,जीव झाला खुळा बावरा. डोक्यावर तुळस घेऊनही अश्विनी या फोटोंमध्ये दिसतेय. एका फोटोला अश्विनीनं कॅप्शन दिली आहे, मनाची शांतता. वारीत येऊन मनाला शांत वाटल्याचं ती सांगते.

अश्विनी तुळस घेऊन

मालिकेत मात्र सगळीकडे अशांतताच आहे. देशमुखांच्या बंगल्यात संजनाचा चुकून धक्का लागून अनघा जिन्यावरून खाली पडते. सगळे जण तिची काळजी घेत आहेत. त्यात संजनाही आहे. पण अनिरुद्ध संजनाला म्हणतोय, तूच अनघाला मुद्दाम खाली ढकललंस. या वक्तव्यानं संजना दुखावते. दोघांचं भांडण सुरू होतं.

सणांचं कॅलेंडर आत्ताच बुक! ठरवा कोणत्या सणाला कोणता सिनेमा पाहणार

आई कुठे काय करते मालिकेत अनघा काॅन्सिलर आहे. न पटणाऱ्या गोष्टींना ती नेहमीच शांतपणे विरोध करताना दिसते. मालिकेत तिची भूमिका आता आश्वस्त वाटायला लागली आहे. त्यामुळे संजनाही तिच्याकडे येऊन मन मोकळं करते.

संत निळोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, विठुरायाच्या भेटीची आस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here