मुंबई : राज्यात मागील १० दिवसांपासून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर काल महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर या चाचणीआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं पसंत केलं. मात्र आता भाजपच्या एका नेत्याचा जुना व्हिडिओ व्हायरल होत असून भाजपने सत्तापालटाची तयारी आधीच करून ठेवली होती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर कंबोज यांनी राज्य सरकारला खुलं आव्हान दिलं होतं. ‘१ जून ही तुमची तारीख आहे, मात्र ३० जून माझी असेल. गंगामाई आणि महादेवाची शपथ घेऊन सांगतो, १ जुलै हा दिवस येऊन देणार नाही, हे लक्षात ठेवा,’ असं कंबोज यांनी म्हटलं होतं. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर मोहित कंबोज यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर बंडखोरांनी सेलिब्रेशन केलं? दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण

नेमकं काय होतं प्रकरण?

आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर कारवाईविरोधात कारवाईचा फास आवळला होता. मोहित कंबोज यांच्यावर गुन्हे शाखेने मुंबईत गुन्हा दाखल केला. कंबोज यांच्या कंपनीने ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते, त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले, असा आरोप करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here