मुंबई- गंगूबाई काठियावाडीपासून अभिनेत्री आलिया भट्ट या नावाची जी चर्चा सुरू आहे ती अजूनही थांबायला तयार नाही. आलियाने साकारलेल्या गंगूबाई भूमिकेचं कौतुक होत असतानाच तिच्या आणि रणबीरच्या लग्नाने लक्ष वेधून घेतलं. आलिया आणि रणबीर यांचं लग्न हा उत्सुकतेचा विषय होताच. मग त्यानंतर आलियाचा वेडिंग लुक, मंगळसूत्राचं डिझाइन, हनिमून, लग्नानंतरचे त्यांचे गुलाबी दिवस या बातम्यांनीही फुटेज घेतलं.

जेव्हा आलियाच्या आई होण्याच्या बातमीचीही उडवली जाते खिल्ली

आलिया लग्नानंतर तिच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाली. आरआरआर सिनेमातील आलियाचं गाणंही गाजलं. रॉकी और रानी की प्रेमकहानी या सिनेमाच्या निमित्तानेही आलियाची हवा आहे. तर हार्ट ऑफ स्टोन या पहिल्या हॉलिवूड सिनेमासाठी लंडनमध्ये गेली असतानाच आलिया आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना मिळाली. मग काय, आलिया आणि रणबीर या जोडीवर अभिनंदनाचा पाऊस सुरू झाला.


आलिया सध्या लंडनमध्ये आहे. लवकरच ती रणबीरसोबत भारतात येणार आहे. तिच्यावर बॉलिवूड आणि भारतातील तिचे चाहते तर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेतच, पण लंडनमध्ये सध्या सुट्टीचा आनंद घेत असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आलियाला शुभेच्छा दिल्या. यामध्ये एक खास व्यक्ती आलियाला भेटली आणि त्यांचा फोटो करण जोहरने शेअर केला आहे. ही तर माझी ऑनस्क्रिन आवडती जोडी अशी कॅप्शन लिहून करणने त्याच्या सिनेमाचंही प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही.

रॉकी और रानी


आलिया लवकरच हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. तर करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेमकहानी या सिनेमातून चाहत्यांना भेटणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू असून रणवीर सिंग सोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. आलियाच्या सध्याच्या लंडन मुक्कामी रणवीर सिंगने भेटून तिला आई होणाऱ्या असल्याच्या आनंदानिमित्त शुभेच्छा दिल्या. आलिया आणि रणवीर यांची ही लंडनमधील खास भेट करण जोहर ने कॅमेऱ्यात कैद केली आणि इन्स्टापेजवर फोटो शेअर केला. मुझे रानी और रॉकी मिले अशी कॅप्शन करणने लिहिली आहे. या फोटोत आलिया आणि रणवीर यांचा लुकदेखील स्पेशल आहे.


आलिया आणि रणवीर ही जोडी तर सध्या लंडनमध्ये आहेच पण अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. करण जोहर त्याची आई आणि जुळया मुलांसह लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानेही सुट्टीसाठी लंडनमध्ये मुक्काम ठोकला आहे. करिना कपूर आणि सैफ अली खान मुलांसोबत लंडनमध्ये आहेत, तर सारा अली खानही लंडनमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. दोन दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीर यांनी ते आई- बाबा होणार असल्याची बातमी सोशलमीडियावरुन चाहत्यांना सांगितली होती.

या दिवशी येणार पुष्पा २, मेगास्टारचीही सिनेमात नवी एण्ट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here