मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपकडून सत्तेचा दावा करण्यात येणार आहे. शिंदे यांच्यासोबत एकूण ४९ आमदार आहेत. त्यातील १० अपक्ष आमदार असून सेनेचे ३९ आमदार आहेत. सध्या शिंदे यांचा गट गोव्यातील ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. तर शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. फडणवीस आणि शिंदे लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. सध्या फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सत्ता स्थापनेबद्दल पुढील निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र मोहीम फत्ते, आता भाजपकडून मिशन १४४ची तयारी; विनोद तावडेंवर विशेष जबाबदारी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील मंत्रिमंडळात भाजपचे २९ जण असू शकतात. तर शिंदेंच्या गटातील १३ जणांना मंत्रिपदं मिळू शकतात. यापैकी ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे.

कोणाकोणाला मिळणार मंत्रिपदं?
टिम फडणवीसमधून कोणाला संधी?

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील किंवा राम शिंदे
संभाजी पाटील निलंगेकर
मंगल प्रभात लोढा
संजय कुटे
रविंद्र चव्हाण
डॉ. अशोक उइके
सुरेश खाडे
जयकुमार रावळ
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
माधुरी मिसाळ

-राज्य मंत्री
प्रसाद लाड
जयकुमार गोरे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
बंटी बंगाडिया
शिंदे गटाचा नवा डाव, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात येण्याचा व्हिप?
टिम शिंदेकडून कोणाला संधी?
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
संजय राठोड
शंभूराज देसाई
बच्चू कडू

राज्य मंत्री
दीपक केसरकर
संदिपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले
तानाजी सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here