एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस चर्चा झाल्यानंतर ते राज्यपालांना भेटणार आहेत.

 

Eknath Shinde Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल
  • एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार?
  • ठाकरेंच्या मंत्रिमंडळात नगरविकास खातं
मुंबई :एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्यानं काल रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे दुपारी मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना कोणतं खात मिळणार या चर्चा सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं होतं. नव्या सरकारमध्ये त्यांना कोणतं खातं मिळणार यासंदर्भात चर्चा सुरु आहेत.

नगरविकास खातं मिळेल का?
भाजप आणि शिवसेना यांच्यातील २०१४ ते २०१९ मधील युतीच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं होतं. आता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस याचं सरकार स्थापन होणार आहे. या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं मिळेल का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेहमी मुख्यमंत्री नगरविकास खातं स्वत:कडे ठेवतात.
उदयनराजे तातडीने फडणवीसांना भेटले; कोणता डाव खेळला?, जिल्ह्यात कमालीची उत्सुकता
शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद ?
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला सत्तेच्या वाटपामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपंद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे यांच्याकडे महसूल खातं जाऊ शकतं, अशा चर्चा सुरु आहेत.
शिंदे गटाचा नवा डाव, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात येण्याचा व्हिप?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी कधी ?
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून उद्या दुपारी शपथ घेतील, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आज सायंकाळी ७ वाजता होऊ शकतो.
राज्यात लवकरच फडणवीस-शिंदे सरकार! कसं असणार मंत्रिमंडळ? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी 92570049

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : uddhav thackeray gave urban development portfolio to eknath shine which portfolio get in devendra fadnavis government
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here