– २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती
– भाजप १०५ शिवसेना ५६ जागा अशा १६१ जागा आणि अपक्ष असे १७० जण होते. अपेक्षा होती की सेना-भाजप युती होईल. पंतप्रधानांनी तशी घोषणा केली. मात्र, निकालानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला
– बाळासाहेबांनी नेहमी ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं, हा जनादेशाचा अपमान होता
– जनतेने महाविकास आघाडीला नाही, तर युतीला मत दिलं होतं.
– अडीच वर्षात पायाभूत सुविधांना जागा मिळाली नाही प्रचंड भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्ट्चारात जेलमध्ये गेले, मनी लाँड्रिंगसाठी जेलमध्ये जाणं ही खेदजनक बाब
– शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं, पण राज्यपालांचं पत्र आलं, त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते. विश्वासमत होईपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते
– संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील ते निर्णय पुन्हा घ्यावे लागणार आहेत, पण त्याला आमचं समर्थनच आहे.
– एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते. शिवसेनेची कुंचबणा, हिंदुत्वावर मतं मागायची कशी, कुठल्या भरोशावर लढायचं, आमच्याच मतदारसंघात हरलेल्या विरोधकांना निधी मिळाला
– उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत त्यांचीच कास धरुन ठेवली आणि आमदारांचं ऐकलं नाही
– महाराष्ट्राला पर्यायी सरकार द्यायची गरज होती
– सरकार पडलं की निवडणुका होतील का, असं विचारलं जायचं . लोकांच्या डोक्यावर आम्ही निवडणुका लादणार नाही
– शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांचा गट, भाजप आमदार, १६ छोटे पक्षांचे आमदार एकत्र. आम्ही सत्तेच्या मागे नाही, ही तत्त्वं, हिंदुत्व, विचारांची लढाई
– एकनाथ शिंदेंना भाजप समर्थन देईल आणि ते मुख्यमंत्री होतील
– साडेसात वाजता एकट्याचा शपथविधी