हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शिंदेंनी शपथ घेतली.

 

Eknath Shinde Oath Ceremony
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शिंदेंनी शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपातील इतर नेते उपस्थित होते. तसेच, या शपथविधी समारंभाला एकनाथ शिंदेंच्या कुटुंबानेही हजेरी लावली.

विधानपरिषदेत्या तब्बल ११ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर या नाट्याच्या शेवट झाला. काल रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच फिरत होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालाची भेट घेत त्यांना सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra chief minister eknath shinde devendra fadnavis oath taking ceremony latest update political news today
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here