एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपण या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं फडणवीस दोन तासांपूर्वी म्हणाले होते. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या.

 

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी
  • दोन तासांत सूत्रं फिरली
  • पंतप्रधान मोदींचे फडणवीस यांना दोन फोन
मुंबई: राज्याच्या राजकारणात सुरू असलेलं सत्तानाट्य संपत आलं आहे. मात्र तरीही नाट्यमय घडामोडी काही संपत नाहीएत. एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री होतील. मी या सरकारमध्ये नसेन, अशी घोषणा फडणवीसांनी केली. फडणवीसांच्या घोषणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र फडणवीस यांनी शिंदेंचं नाव जाहीर केलं. मात्र गेल्या २ तासांत वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसा आदेश पक्ष नेतृत्त्वानं फडणवीस यांना दिला होता.

फडणवीस यांनी शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा त्यांना फोन केला. मोदींच्या आग्रहानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला. मंत्रिमंडळात काम करण्याऐवजी मला पक्षवाढीसाठी काम करण्याची संधी द्या, असं फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाला सांगितलं. मात्र फडणवीस यांची मागणी अमान्य करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याची मागणी मान्य केली.
मोदींचे फडणवीसांना दोन फोन अन् मग…; अवघ्या दोन तासांत राज्यात नाट्यपूर्ण घडामोडी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांची महाराष्ट्रासाठी असलेली खरीखुरी निष्ठा आणि सेवाभाव दिसतो. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, असं ट्विट शाह यांनी केलं.

शाहांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : i follow my party order says devendra fadnavis after taking oath as deputy cm
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here