Uddhav Thackeray BMC Election 2022 | २०१७ च्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांपैकी ८४ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर भाजपनेही ८२ जागांवर विजय मिळवला होता. यंदा मुंबईतील प्रभाग वाढून २३६ वर गेले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवून मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करेल, अशी शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

हायलाइट्स:
- मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची
- शिंदे गट भाजपला जाऊन मिळाल्यास निश्चितच त्यांची ताकद वाढेल
- ०१७ च्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांपैकी ८४ जागांवर शिवसेना विजयी झाली होती
त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील. तब्बल गेल्या तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१४ नंतर भाजपच्या आक्रमकतेपुढे राज्यातील अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली असली तरी सेनेचा मुंबईचा बालेकिल्ला अभेद्य राहिला होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या जवळपास पोहोचत उद्धव ठाकरे यांचा हा बालेकिल्ला फारकाळ सुरक्षित राहणार नाही, याची जाणीव करुन दिली होती. २०१७ च्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांपैकी ८४ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर भाजपनेही ८२ जागांवर विजय मिळवला होता. यंदा मुंबईतील प्रभाग वाढून २३६ वर गेले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवून मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करेल, अशी शक्यताही बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्त्वासाठी खऱ्या अर्थाने ‘करो या मरो’ची ठरणार आहे.
मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत शिंदे गट भाजपला जाऊन मिळाल्यास निश्चितच त्यांची ताकद वाढेल. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन एकत्रपणे लढण्याचा पर्याय आहे. एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात मोठं प्रस्थ असलं तरी मुंबई परिसरात त्यांची फारशी अशी ताकद नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची लढत ही खऱ्या अर्थाने ठाकरे विरुद्ध भाजप, अशी असेल. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले शिवसेना नगरसेवक भाजपला जाऊन मिळू शकतात.
अशावेळी शिवसेनेची सर्व भिस्त ही मुंबईतील तळागाळापर्यंत असलेल्या संघटनात्मक बांधणीवर असेल. मुंबईतील शिवसेनेच्या शाखा आणि शाखाप्रमुख या निवडणुकीत शिवसेनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पक्षाचे आमदार आणि खासदार हे हरत किंवा जिंकत असतात. मात्र, शिवसेना आपल्या शाखांच्या माध्यमातून सातत्याने काम करत असते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या संघटनात्मक ताकदीचा वापर करुन भाजप आणि एकनाथ शिंदे यांना शह देणार का, हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bmc election will make or break shivsena uddhav thackeray camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network