जळगाव : राज्यात काल महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण यानंतर केंद्रातून आलेल्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीसांसारखा बडा नेता उपमुख्यमंत्री पदावर काम करणार, ही बाब खरंतर अनेकांना खटकली पण यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

‘प्याद्याला घेऊन योग्य चाल खेळलीत तर तो सर्वशक्तिशाली होतो’; पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगलं काम त्यांनी करावं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.

घडलेलं नाट्य हे अनअपेक्षित आहे…

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा आहे. मात्र, पूर्ण ती झालेली नाही. परिस्थितीनुसार त्यांनी हे पद स्वीकारलं असल्याचा टोलाही यावेळी खडसे यांनी फडणवीसांना लगावला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे कोणत्या पक्षाचे तसेच त्यांनी कोणता पक्ष म्हणून भाजपला पाठिंबा दिला, यावर विचारले असता खडसे म्हणाले की, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच नेमकी खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट होईल, असेही खडसे यांनी सांगितले.

Rain Update: आज मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here