Gold Import Duty Hike : मागील आठवडभरापासून चलन बाजारात रुपयाचे प्रचंड अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ७९ खाली गेला आहे. त्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी केंद्राने आक्रमक पावले उचलली आहेत.

हायलाइट्स:
- स्वस्त सोनं खरेदीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांच्या स्वप्नांना तडा जाणार आहे.
- केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
- रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
खूशखबर! पेट्रोलियम कंपन्यांनी सिलिंडरच्या किंमतींबाबत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या
सोने खरेदी करणारा भारत हा जगातील दुसरा मोठा ग्राहक आहे. दरवर्षी सरासरी ८०० ते ९५० टन सोन्याची आयात केली जाते. यासाठी प्रचंड परकीय चलन खर्ची करावे लागते. सरकारने सोने खरेदीवर अंकुश आणण्यासाठी आज सोन्यावरील आयात शुल्क १२.५ टक्के इतके वाढवण्यात आल्याची घोषणा केली. यापूर्वी सोन्यावर ७.५ टक्के आयात शुल्क आकारले जात होते. सोने आयात शुल्क १२.५ टक्के झाल्याने सोन्याच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे.
नव्या पिढीच्या हाती ‘रिलायन्स’चे नेतृत्व; मुकेश अंबानी लाडक्या लेकीच्या हाती सोपवणार ‘ही’ कंपनी
गेल्या आठवड्यात रुपयाने ७९ ची पातळी ओलांडली होती. आज शुक्रवारी रुपयाने ७९.०८ चा नवा नीचांकी स्तर गाठला. परिणामी चालू खात्यातील तूट प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये चालू खात्यातील तूटीची शिल्लक जीडीपीच्या केवळ १.२ टक्के इतकीच उरली आहे. तर व्यापारी तूट १८९.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
रुपयाचा नवा नीचांक; चलन बाजारात डॉलरसमोर रुपया गडगडला
गेल्या वर्षभरात सोने आयातीत वाढ झाली आहे. करोना टाळेबंदीनंतर २०२१ या वर्षात सोने आयातीचे प्रमाण वाढले असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने अहवालात म्हटले होते. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१५८७ रुपये इतका आहे. त्यात तब्बल १००० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव एक किलोसाठी ५९,१२९ रुपये असून त्यात मात्र १५८ रुपयांची घसरण झाली.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network