Dhananjay Munde Meets Devendra Fadnavis: सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते.

हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील राजकारणात चक्रावणाऱ्या आणि धक्कादायक घटना
- भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद देऊ केले होते
- धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर
सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर धनंजय मुंडे हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते. त्यामुळे आतादेखील काही नवीन राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
राज्यातील गेल्या काही तासांमधील राजकारणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांना कोरोना झाल्यामुळे ते सध्या इतरांपासून अंतर राखून आहेत. मात्र, त्यांच्या मर्जीतील असलेले धनंजय मुंडे आता फडणवीसांना भेटल्याने आगामी काळात आणखी नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp leader dhananjay munde meets bjp dcm devendra fadnavis at sager bunglow in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network