मुंबई : आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये आहे. तिथे ती हाॅलिवूड सिनेमाचं शूटिंग करतेय. आलिया लंडनमध्ये करण जोहर, आदर जैन आणि त्याची पत्नी तसंच रिमा जैन यांच्या बरोबर आपला वेळ घालवतेय. त्यांचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे पसरलेत. आलिया गरोदर असल्याचं कळल्यावर तिचे चाहते तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. आता ती तिचे मित्र मैत्रिणी, कुटुंबीय यांच्या बरोबर एक एक क्षण आनंदात घालवताना दिसत आहे.

पावसात मुंबई रोमँटिक वाटते, म्हणत श्रेयस तळपदे इतका भिजलाय! Photo झाले Viral

याआधी आलिया भट्टचे लंडनमधले काही फोटो समोर आले होते. त्यात करिना कपूर, मनीष मल्होत्री, करण जोहर, नताशा पूनावाला दिसत होते. याशिवाय आलियासोबत गौरी खान आणि ट्विंकल खन्नाही होत्या.

कामानिमित्तान रणवीर सिंगही आलिया भट्टला भेटला होता. करण जोहरनं दोघांचे फोटोही शेअर केले होते. याच वेळी करिना कपूर म्हणजे आलियाची नणंदही लंडनला आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टी एंजाॅय करत आहे.

आलिया करण

आलिया पहिल्यांदा हाॅलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ सिनेमात काम करत आहे.यात तिच्या बरोबर गेल गॅडोट आणि जेमी डोरनान हेही आहेत.

आलिया लंडनमध्ये

आलिया भट्टचे सिनेमे नेहमीच बाॅक्स ऑफिसवर कमाल करतात. आता ब्रह्मास्त्र सिनेमाकडूनही अपेक्षा आहेत. त्यात ती पहिल्यांदाच रणबीर कपूर बरोबर असेल. याशिवाय ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात ती रणवीर सिंगसोबत आहे. करण जोहरचा हा सिनेमा आहे.

भयंकर- स्वयंपाकीने दिली माही- जयला जीवे मारण्याची धमकी

आलियाच्या निर्मिती संस्थेतर्फे ‘डार्लिंग्ज’ हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यूज आहेत. जसमीत के रीन यानं दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here