सांगली : मुलीच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेने व्यथित झालेल्या आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी इथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलीच्या मृत्यूच्या वियोगाने आई-वडिलांनी हे पाऊल उचलले.

आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी या ठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दोन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी थेट आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. करण हेगडे, वय वर्ष २८ आणि शीतल हेगडे, वय वर्ष २२, असं या माता-पित्यांचे नाव आहे.

Weather Alert : राज्यात पुढचे ३-४ तास मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट जारी
दोन दिवसांपूर्वी हेगडे दाम्पत्याची दोन वर्षांच्या मुलीच्या घशात खाऊचा पदार्थ अडकला होता. ज्यातून मुलीचा मृत्यू झाला. या दरम्यान मुलीची झालेली तडफड पाहून हेगडे दाम्पत्य हे व्यथित झाले होते. त्यामुळे माता-पित्याने आपलं देखील आयुष्य संपवला आहे. राजेवाडी येथील काणबुनाथ मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन हेगडे दांपत्याने आत्महत्या केली आहे.

घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर त्यांना दाम्पत्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. ज्यामध्ये मुलीचा झालेला मृत्यू हा सहन झाला नाही. यातूनच आम्ही हे आत्महत्या करत असून याला कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिल्याचं आटपाडी पोलिसांच्याकडून सांगण्यात आला आहे. मात्र, मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Floor Test Update: ठाकरेंना धक्का, शिदें गटाची सरशी, शिवसेनेच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here