Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 1, 2022, 1:05 PM
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन सोबत ७ जून २०१९ रोजी लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांना मुलगीही झाली. पण आता या दोघांचं नातं संपुष्टात आलं आहे.

चारू आणि राजीव यांना एक मुलगी आहे. तिच्या जन्मानंतरही दोघांचं नात्यातील तणाव कमी होण्याऐवजी वाढत गेला आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजीवनं चारूवर गंभीर आरोप केले आहेत.
लग्न लपवलं
चारूनं तिचं पहिलं लग्न आमच्यापासून लपवलं, असा आरोप राजीवनं केला आहे. ‘चारूचं पहिलं लग्न झालंय ही गोष्ट आम्हाला माहित नव्हती, ही गोष्ट समोर आली तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला, असं राजीवनं म्हटलं आहे. ‘ बिकानेरमध्ये चारूचं गाव आहे. त्या गावातील काही लोक आणि तिच्या घरच्यांव्यतीरिक्त ही गोष्ट कोणालाही माहित नव्हती. हे सर्व आमच्यापासून लपवण्यात आलं. चारूनं तिचा भूतकाळ माझ्यासोबत शेअर करायाला हवा होता. मी हे स्वीकारलं असतं. पण अशा पद्धतीनं समोर आल्यानं मला धक्का बसला आहे’, असं राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network