मुंबई : अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच चर्चेत असते. सिनेमाबरोबर ती नेहमी फिटनेसचीही काळजी घेत असते. ती लवकरच एक व्हिलन रिटर्न्स सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमात दिशा काळ्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती. तिच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. ती सुंदर तर दिसत होतीच. पण तरीही फॅन्सना काही तरी खटकलं. त्यांचं म्हणणं पूर्वी ती नैसर्गिक सुंदर दिसायची. आता तशी दिसत नाही.

मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदें पण खरा आनंद कंगना रणौतलाच झाला

२०१४ मध्ये एक व्हिलन हा सिनेमा आला होता. त्याचाच सिक्वल एक व्हिलन रिटर्न्स आहे. आधीच्या सिनेमात रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तो सिनेमा प्रेक्षकांना आवडला होता. आता या सीक्वलमध्ये जाॅन अब्राहम, अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पाटनी आहेत. सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला.

दिशा दिसत होती सुंदर
या इव्हेंटमध्ये दिशानं काळ्या रंगाचा co-ord set सेट घातला होता. आपलं टोन्ड शरीर ती दाखवत होती. खरं तर ती या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती

चाहत्यांना लूक बदललेला वाटला
काही फॅन्सना मात्र तिचा चेहरा बदललेला वाटला. या व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळे कमेंट येत आहेत. काही म्हणतायत, तिनं नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तर काही म्हणतात, ओठांवर शस्त्रक्रिया केलीय. एकानं लिहिलं आहे, ती नैसर्गिक खूप सुंदर दिसायची. आता कशी दिसतेय!

दिशा पाटनीवर टीका

एक व्हिलन रिटर्न्स या महिन्यात प्रदर्शित
एक व्हिलन सिनेमाचा हा सीक्वल येत्या २९ जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे.

दिशाचे येणारे सिनेमे
दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा सिनेमात आहे. याशिवाय एकता कपूरच्या KTina सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पावसात मुंबई रोमँटिक वाटते, म्हणत श्रेयस तळपदे इतका भिजलाय! Photo झाले Viral

Y इतिहास कळला आता वास्तवात या, असं का म्हणतायेत नंदू माधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here