हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे…
– कदाचित आज पहिल्यांदा माझा चेहरा पडला असेल, मला खरोखर दु:ख झालं आहे. माझ्यावर राग आहे ना, तो राग माझ्यावर काढा. मुंबईवर काढू नका, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका
– तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, ज्यांनी हे सरकार स्थापन केलं, त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. जे माझं आणि अमित शहांचं ठरलं होतं की अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद
– तेव्हा नकार दिला, आता असं काय केलं? शिवसेनेला बाजुला ठेवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री असं होऊ शकत नाही.
– अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं.
– आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे मला दु:ख. आरेचा प्लॉट कुणाचा खासगी नाही. मी पर्यावरणाच्या बाजूने आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा निर्णय घेऊ नका.
– ७५ वर्षांत लोकशाहीचे धिंडवडे निघाले. चारही स्तभांनी लोकशाही वाचविण्यासाठी पुढे यावं. लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.
– हात जोडून विनंती करतो. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले.
– सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा असं आमदारांनी फिरणं म्हणजे ही जनतेच्या मतांशी प्रतारणा आहे.
– मला जे काही मेसेज आले, मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत. त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही.
– तुमची अश्रू म्हणजे माझी ताकद. तुमच्या ताकदीशी हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते जाते आणि ती परत येते पण असं प्रेम मिळणं म्हणजे भाग्य लागतं.