Devendra Fadnavis deputy CM | देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल. मात्र, या सरकारमध्ये मी मंत्री नसेन, असे देवेंद्र यांनी म्हटले होते. परंतु, त्यानंतर काहीवेळात दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील व्हावे, असे निर्देश दिले होते.

 

Devendra Fadnavis Brahmin
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • भाजप नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे निर्देश दिले
  • देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले
  • फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसायला लावून भाजपने त्यांचे खच्चीकरण
मुंबई: राज्यात नव्याने स्थापन होऊ घातलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नसतानाही यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या राजकीय लढाईत आता ब्राह्मण महासंघानेही (Brahmin Mahasangh) उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसायला लावून भाजपने त्यांचे खच्चीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.

नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी त्यांचे चारित्र्यहनन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेतेमंडळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची घोडदौड रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याने भाजपला पुन्हा सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवल्यानंतर भाजप नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले, असा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला.
‘ते’ पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री म्हणून, राज्यपालांकडून फडणवीसांना शपथ!
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल. मात्र, या सरकारमध्ये मी मंत्री नसेन, असे देवेंद्र यांनी म्हटले होते. परंतु, त्यानंतर काहीवेळात दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील व्हावे, असे निर्देश दिले होते. देवेंद्र फडणवीस हे यासाठी राजी नव्हते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाच्या दबावामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांचे फोन आल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले. त्यानंतर देवेंद्र यांनी एक ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली होती. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leadership makes devendra fadnavis accept demotion makes devendra cm ekanth shinde deputy brahman mahasangh criticism
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here