मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ‘माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईच्या काळजात नको’, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच आरेच्या निर्णयावरुन देखील मला दु:ख झालं असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे.

‘मुंबईच्या पर्यावणाशी खेळू नका’

मुंबईच्या पर्यावणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरे कारशेड उभारू नका असंही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघडीचं सरकार आलेच नसते, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाही. शिनसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचं मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असतं तर महाविकास आघाडीचे सरकार आलचं नसतं. सगळं झालं असतं. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असंही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असंही ते म्हणाले.

माझं आणि अमित शाहांचं हेच ठरलं होतं, भाजपच्या गेम प्लॅनवर ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह
‘तुमच्या डोळ्यातील अश्रूंची माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही’

आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार. ठरल्याप्रमाणे झालं असते तर भाजपचा अडीच वर्ष मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपला काय मिळाले, भाजपच्या मतदारांना काय आनंद मिळाला, यातून जनतेला काय मिळणार हे लवकरचं कळेल, अशीही आठवण त्यांनी यावेळी बोलताना करून दिली. गेल्या काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा आभारी असल्याचं ठाकरे म्हणाले. माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, उद्धव ठाकरेंचं शिंदे फडणवीसांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here