हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
दरम्यान, २८ जून रोजी सदर कोतवाली परिसरातील रामापूर चौकीतील एका गावात उसाच्या शेतातून अल्पवयीन तरुणाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी सदर कोतवाली इथे कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांना या प्रकरणी यश आले असून या हत्येतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सामूहिक बलात्कार सुरू असताना मोठ्या बहिणीने धरले होते हात
या घटनेचा धक्कादायक खुलासा करताना पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, मृताच्या मोठ्या बहिणीचे गावातीलच ४ लोकांशी शारीरिक संबंध होते आणि मयत किशोरी आपल्या मोठ्या बहिणीला विरोध करत होती. त्यामुळे दोघींमध्ये वाद सुरू होता.
हेही वाचा – गुप्तधन, ‘ती’ खोली, २० नारळ, चहा; सांगलीतल्या ९ जणांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम वाचून हादराल
२८ जूनला मृताची मोठी बहीण तिला सोबत घेऊन उसाच्या शेतात शौचास गेली. यावेळी मोठ्या बहिणीनेही पूर्ण प्लॅनिंग करून चार प्रियकरांना शेतात बोलावलं. त्यांच्यासोबत आणखी दोन तरुणही आले. यानंतर गावातील ४ तरुणांनी मोठ्या बहिणीसमोर पीडितेवर एकामागून एक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीवर बलात्कार होत होता तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने स्वतः तिचा हात धरला होता.