मी पद सोडताना अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

मुंबई : राज्यातील जनतेने सोशल मीडियावरुन दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल मावळते मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋण व्यक्त केले. मला जे काही मेसेज आले, मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नव्या सरकारच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना भवनात दुपारी पावणे दोन वाजता उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. ठीक दोन वाजता त्यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं, त्यांना महाराष्ट्रहिताचे निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. भाजपने तथाकथित शिवसैनिक मुख्यमंत्री केला म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्व आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. कांजूरमार्गचा निर्णय कायम राहू द्या, अशी विनंती त्यांनी नव्या सरकारला मुंबईकर म्हणून केली. सरतेशेवटी लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना उद्धव ठाकरे काहीसे भावूक झाले.

माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईच्या काळजात नको – उद्धव ठाकरे
कदाचित आज पहिल्यांदा माझा चेहरा पडला असेल, मला खरोखर दु:ख झालंय. माझ्यावर तुमचा राग आहे ना, तो राग माझ्यावरच काढा, मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे मला दु:ख झालंय. मी पद सोडताना अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही. तुमची अश्रू म्हणजे माझी ताकद आहे. तुमच्या ताकदीशी हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते जाते, पण असं प्रेम मिळायला भाग्य लागतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आता तर पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही, ठाकरेंकडून फडणवीसांच्या जखमेवर मीठ
विचित्र पद्धतीने शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचून स्वत: मुख्यमंत्री बनण्याचा जो त्यांनी अट्ट्हास केला तो महाराष्ट्राला आवडेल न आवडेल, पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, अशी सूचक कमेंटही उद्धव ठाकरेंनी जाताजाता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here