अकोला : जिल्ह्यातील धोतर्डी गावात पोटच्या तीन मुलांना विष पाजून नंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप वडिलांवर होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपी वडिलांची निर्दोष सुटका केली आहे. मात्र, कारागृहातून सुटताचं त्याचं वडिलांनी आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं आहे.

बोरगांव मंजू रेल्वे परिसरात आत्महत्या

धोतर्डी येथील रहिवासी असलेला विष्णु दशरथ इंगळे यांनी काल बोरगांव मंजू रेल्वे परिसरात आत्महत्या केली आहे. परिसरातील झाडाला दोर बांधून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सद्यस्थितीत या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विष्णु इंगळे यांची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता २९ जून रोजी झाली होती. आता कारागृहातून बाहेर येताच त्यांनी काल आत्महत्या केली आहे.

सेलिब्रेशनमध्ये फडणवीसच गैरहजर, भाजप कार्यकर्त्यांनी कटआऊट नाचवले, अनुपस्थितीचं कारण समोर
विष्णू यांच्यावर नेमके काय आरोप होते?

१० मे २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीती असलेले धोतर्डी हे गाव तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. आरोप होता की, आरोपी विष्णु दशरथ इंगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्यांनी त्यांची तीन मुले १७ वर्षीय अजय इंगळे, १५ वर्षीय मनोज इंगळे आणि १२ वर्षाची मुलगी शिवानी इंगळे यांना विष पाजून त्यांची वरवंट्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भांदविचे कलम ३०२, ३०९ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आजपर्यंत आरोपी कारागृहात होता.

सदर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपीचे वकिल देवानंद गवई यांनी उलटतपासणीत साक्षीदारांचे म्हणणे खोडून काढले. आरोपीला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली हे सिद्ध करून सांगितले. बचाव पक्षाचे वकिल आणि सरकार पक्षाचे युक्तीवादानंतर सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. मात्र, कारागृहातून सुटताचं त्याच वडिलांनी आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं आहे.

माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईच्या काळजात नको – उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here