मुंबई : एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत. ३० जून रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या आधी उद्धव ठाकरे हे या पदावर होते. शिंदे हे एके काळी शिवसेनेत महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे किंवा त्यांची मालमत्ता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही संपत्तीवर एक नजर टाकूया…

उद्धव ठाकरे हे १४३ कोटी २६ लाखांचे मालक

उद्धव ठाकरे २०२० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार झाले. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १४३ कोटी २६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. इतकंच नाहीतर उद्धव यांच्यावर १५ कोटी ५० हजार रुपयांची देणेदारीही आहे. तर उद्धव हे दोन बंगल्यांचे मालक आहेत.

माझा राग मुंबईकरांवर नको; उदास चेहऱ्याने उद्धव ठाकरे काय म्हणाले? वाचा पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
उद्धव ठाकरे यांच्याकडे ७६.५९ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी ५२.४४ कोटी रुपये स्थावर आणि २४.१४ कोटी रुपयांची अस्थिर मालमत्ता आहे, उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ६५.०९ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी २८.९२ कोटी रुपये स्थावर आणि ३६.१६ कोटी रुपये अस्थिर संपत्ती आहेत.

एवढ्या मालमत्तेचे मालक आहेत एकनाथ शिंदे

एका रिक्षाचालकापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रत्रिज्ञापत्रात शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाखाहून अधिक संपत्ती आहे (Eknath Shinde Net Worth). यातील ९.४५ कोटी ही स्थिर तर २.१० कोटी इतकी अस्थिर संपत्ती आहे.

सामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांचा प्रवास सुरू झाल्याने पक्षासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. सेनेसाठी ते तुरुंगात देखील गेलेत. त्यांच्यावर १८ गुन्हा दाखल आहेत. प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी त्यांचा व्यवसाय बांधकाम व्यवसाय असे म्हटले आहे. शिंदे यांच्याकडे सात गाड्या असून त्याची एकूण किंमत ४६ लाख इतकी आहे.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

फडणवीस यांच्या संपत्तीत १०० टक्के वाढ

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३.७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी २०१४ च्या तुलनेत १०० टक्के अधिक आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती २०१४ मधील १.८१ कोटी रुपयांच्या तुलनेत ३.७८ कोटी इतकी आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही मुंबई अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. अमृता फडणवीस यांची संपत्ती ९९.३० लाख रुपये आहे.

बँक बॅलन्सबाबत बोलायचं झालं तर फडणवीस यांच्याकडे आठ लाख २९ हजार ६६५ रुपये बँकेत आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे २.३३ कोटी रुपये बँकेत आहेत.

देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? किरीट सोमय्यांनी सांगितलं खरं कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here