सांगली : जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील बलवडी-भाळवणी या ठिकाणी सख्ख्या भावाने आपल्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन घालून ही हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्याचं भावाने तो चक्कर येऊन पडल्याने ही घटना घडल्याचा बनाव केला. मात्र, विटा पोलिसांनी त्याचा बनाव उघडकीस आणत हत्या करणाऱ्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

खानपूर तालुक्यातील बलवडी-भाळवणी येथील वैभव अर्जुन पवार (वय ३८) याचा त्याच्याच सख्ख्या भावाने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी विनोद अर्जुन पवार (वय २४) या हत्या करणाऱ्या भावास अटक करण्यात आली आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बलवडी येथील वैभव अर्जुन पवार यास ३० जून रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये डोक्याला मार लागला म्हणून उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र,त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

VIDEO | फडणवीसांवर पंकजा मुंडे नाराज? छे-छे, हा व्हिडीओ बघा, कशी पाठीवर थाप दिली
त्यावेळी त्याचा भाऊ विनोद पवार याने वैभव हा चक्कर येऊन दगडावर डोकं पडून ही घटना घडल्याचा बनाव केला. मात्र, घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणे आणि पंचनामा केला असता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता कुटुंबीयांनी या खुनाचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये विनोद याने भाऊ वैभव याच्या डोक्यात नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन घालून हत्या केल्याचं समोर आलं आहे. दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून विनोद याने ही हत्या केल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या खून प्रकरणी मयत वैभव आणि हत्या करणारा विनोद याची आई अलका पवार यांनी फिर्याद दाखल केली असून या हत्याप्रकरणी मयत वैभव पवारचा भाऊ विनोद पवार याला अटक केल्याची माहिती विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

जसप्रीत बुमरा आणि इंग्लंडच्या खेळाडूमध्ये पहिल्याच दिवशी झाला वाद, व्हिडिओ जगभरात व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here