मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे  यांची शिवसेनेच्या नेते पदावरून  काढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. 

पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षने नेतेपदावरून काढण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे 39 आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत.  तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. ही पक्षांतर्गत कारवाई नसून राष्ट्रीय कार्यकरणीत  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी  शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नवीन मुख्यमंत्री  हे शिवसैनिक नसल्याचं सांगितलं. आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला.

संबंधित बातम्या :

शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय बदलण्यास केली सुरुवात, ठाकरे सरकारनेही फडणवीस सरकारचे निर्णय केले होते रद्द

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या हातात एकनाथ शिंदेंची खुर्ची, शिंदे पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here