मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची ई़डीकडून तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आलेल्या संजय राऊत यांनी माझ्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचं मीडियाला सांगितलं. ‘केंद्राची तपासयंत्रणा आहे, सहकार्य केलं, त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी दूर केल्या पाहिजेत, माझ्याकडून पूर्ण सहकार्य केलेलं आहे’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची दुपारी १२ वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु झाली. त्यानंतर ते ईडी कार्यालयाबाहेर आले. दरम्यान, मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र, गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण ९ विकासकांना तब्बल ९०१ कोटींना एफएसआय विकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हकालपट्टी
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली १३८ कोटींची माया जमा करण्यात आली. मात्र, यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल १०३९.७९ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात १०० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या १०० कोटींपैकी ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं आहे.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देत भाजपनं काय साधलं? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला भाजपचा डाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here