हिंगोली : आज पहाटे पाच वाजता घडलेल्या घटनेने हिंगोली जिल्हा हादरून गेला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणावर काळाने घाला घातल्याने हिंगोलीकरांना आज सकाळी दुःखद घटना कानावर पडली आहे. वसमत शहरांमध्ये राहणारे दोन तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सकाळी भल्या पहाटे व्यायाम ला गेलेले असताना अज्ञात वाहनाने त्या दोघांना उडवलं व ते वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, तसेच मोठ्या प्रमाणावर बघ्याची सुद्धा मोठी गर्दी जमली होती.

सदरील घटना ही पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. अनिल भगवानराव आमले वय २४वर्ष राहणार कृष्ण मंदिर कवठा रोड वसमत आणि गणेश परमेश्वर गायकवाड १८ वर्ष राहणार पौर्णिमा नगर वसमत अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोन्हीही तरुणांचे मृतदेह सकाळी सेव विच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी पुढील तपास वसमत ग्रामीण पोलीस करत आहेत.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वसमत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच यापुढे अशा घटना घडू नये यासाठी या वीट भट्टी रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या दोन्ही भावी पोलिसांचे स्वप्न मात्र अधुरे राहिली आहे. पोलीस होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे घरातील अनेक तरुण सकाळी व्यायामला जात आहेत. वाहनाची वर्दळ असलेल्या रस्त्यावर तरुणांनी व्यायाम साठी जाणे टाळावे, तसेच व्यायाम व रनिंग साठी वर्दळ नसलेल्या व मोकळ्या पटांगणाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी…’; भाजपच्या खेळीवर शिवसेनेचा प्रहार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here