बदलापूर : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अशात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून बऱ्याच भागांमध्ये वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशात उद्या म्हणजे रविवारी बदलापूर इथे पादचारी पूलासाठी गर्डर कार्य सुरू करण्यासाठी रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभाग बदलापूर स्थानकावर ६ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (FOB) बांधण्यासाठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. दि. ३.७.२०२२ रोजी सकाळी १०.५० ते दुपारी ०१.१० पर्यंत अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक जाणून घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, २ मित्र सकाळी व्यायामाला जाताना…
ट्रेनचे वेळापत्रक…

कल्याण येथून सकाळी १०.१३ ते दुपारी १.२६ पर्यंत अंबरनाथ/बदलापूर/कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि बदलापूर येथून सकाळी १०.२६ ते दुपारी १.२२ पर्यंत सुटणाऱ्या अप उपनगरी ट्रेन रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही.

अप एक्सप्रेस गाड्यांचं वळण…

– 17032 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येईल. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना दिवा इथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here