हे वाचा-‘महाराष्ट्रात रानबाजार सुरुच आहे, आता राजी-नामा देतोय’, दिग्दर्शकाच्या पोस्टने खळबळ
अनिश जोग याचा ०१ जुलै रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त सई ताम्हणकर हिने एक ‘बर्थडे पोस्ट’ केली आहे. ‘Happy Birthday You’ असं म्हणत अभिनेत्रीने अनिशसह एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघांच्या मागे झाडी, डोंगर या गोष्टी दिसत आहेत. ही गोष्ट चाहत्याच्या नजरेतून अजिबात सुटली नाही.
हे वाचा-अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट
सईच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, ‘काही झाडी.. काय डोंगर.. काय हाटील.. ओक मदी समदं’. सध्या हा डायलॉग मीमकरांच्या आणि नेटिझन्सचा आवडीचा डायलॉग झाला आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीदरम्यान शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एका व्हायरल ऑडिओमधील हे वाक्य अवघ्या मीमकरांनी उचलून धरलं. अनेकजण या अनुषंगाने पोस्ट करत आहेत किंवा डोंगर-झाडी असणारा फोटो कुणी पोस्ट केला तर त्यावर अशाच कमेंट्स येत आहेत. सईच्या फोटोबाबतीतही असच झालं.
सई ताम्हणकर हिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये देखील अनिशसह एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझी सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण होवोत’, अशा शुभेच्छा सईने अनिशला दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी सईने अनिशचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने असं लिहिलं होतं की, ‘मी तुला कशाप्रकारे ब्लश करायला लावते ना..’. तिच्या या फोटोनंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागली. यानंतर अनिश आणि सईने दोघांनीही एकमेकांचे फोटो पोस्ट केले आहेत, त्यावरुन दोघे रिलेशनशिपमध्ये असण्यावर शिक्कामोर्तबच झाले. तिच्या या ‘दौलतरावां’ची सोशल मीडियावर विशेष चर्चा झाली. याशिवाय दोघांच्याही फोटोंवर सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांनीही अशाच कमेंट केल्या आहेत, ज्यावरुन दोघे डेट करत असल्याचे स्पष्ट होते.