ज्युपिटर वॅगन लिमिटेडने कमर्शिअल इंजिनीअर्स अँड बॉडी बिल्डर्स कंपनीचे पुन्हा संपादन केले. यामुळे भांडवलाचा खर्च कमी होणे, केंद्रीत कामकाज प्रयत्नांमुळे होणारी खर्चाची बचत, रॅशनलायझेशन, प्रमाणीकरण, व्यवसाय प्रक्रियांचे सुलभीकरण, उत्पादकता लाभ, प्रापण क्षमता आणि वितरण लॉजिस्टिक्स याचा समावेश आहे.

CEBBCO ही कंपनी टिपलर्स, ट्रेलर्स आणि देशातील विशेष संरक्षण वाहनांचे एक महत्त्वाचे निर्माते होते. ही कंपनी जेडब्ल्यूएलने बायआउट (त्यांची संस्था) केली. जेडब्ल्यूएल या नव्या चिन्हाखाली बीएसई आणि ‘एनएसई’मध्ये या कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे ट्रेडिंग सुरू झाले. सुधारित विलिनीकरण करारातील तरतुदीअंतर्गत या व्यवसायाकडे एक्स्चेंजमध्ये ३८,७४,४७,४१९ शेअर्स असतील.
शुल्क वाढीनंतर महागलं सोनं; ग्राहकांना द्यावा लागेल सोनं खरेदीवर इतका कर, जाणून घ्या
या एकत्रीकरणामुळे व्यवसायाच्या कामकाजात समन्वय तयार होईल. त्यामुळे अधिक कार्यक्षम रोख रक्कम व्यवस्थापन आणि प्रगतीच्या संधींना निधी पुरविण्यासाठी अमर्यादित रोख रक्कम प्रवाह अधिक कार्यक्षमतेने तैनात केला जाईल. त्याचे दीर्घकालीन लाभ होतील, ज्याने भागधारकांच्या मूल्यात सुधारणा होईल असा दावा कंपनीनं केला आहे. जेडब्ल्यूएलचे ग्रुप उत्पन्न आजच्या घडीला १,१७८.३५ कोटी इतके आहे.
इंधन दर; केंद्राच्या शुक्लवाढीनंतर पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
ज्युपिटर वॅगन लि.चे व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया म्हणाले, “या विलिनीकरणामुळे जडब्ल्यूएलला वृद्धी टप्पा राबविण्यासाठी आर्थिक बळ वापरण्याची क्षमता प्राप्त होईल. यात सध्याच्या उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी कामकाज अपग्रेड करणे, नवीन उत्पादने विकसित करून विस्तारीकरण करणे आणि मार्केट सेक्टर कन्सॉलिडेशनचा समावेश आहे. त्यामुळे अधिक भांडवल व मत्ता असलेल्या शक्तिशाली संस्थेच्या निर्मितीसाठी योगदान होईल.
हा स्मॉल-कॅप स्टॉक ठरला बडा `पॅक`; दोन वर्षात गुंतवणूकदारांना दिला ३९६ टक्के रिटर्न
कमर्शिअल ईव्ही वाहनांवर लक्ष केंद्रीत करून ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी (जेईएम) लाँच करून जेडब्ल्यूएलने अलिकडेच इलेक्ट्रिक मोबिलिटी मार्केटमध्ये पदार्पण केले. ग्रीनपॉवर मोटर कंपनी इन्क. (ग्रीनपॉवर) या कंपनीची उपकंपनी असलेल्या ईए ग्रीनपॉवर प्रायव्हेट लिमिटेडसोबत या कंपनीने जॉइंट व्हेंचर केले आहे. ग्रीनवॉवरशी जेव्ही करून ईव्ही बाजारपेठेत सुरक्षा व शाश्वतेची निर्मिती करून दोन्ही संस्थांच्या तंत्रज्ञान मत्तांची सांगड घालण्याचा प्रयत्न जेडब्ल्यूएल करत आहे.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.